scorecardresearch

इराणमध्ये फुटीरतावाद्यांच्या हल्ल्यात १९ जण ठार

इराणच्या आग्नेय भागातील झाहेदान शहरातील एका पोलीस ठाण्यावर सशस्त्र फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड’च्या चार जवानांसह १९ जण मृत्युमुखी पडले.

इराणमध्ये फुटीरतावाद्यांच्या हल्ल्यात १९ जण ठार
इराणमध्ये फुटीरतावाद्यांच्या हल्ल्यात १९ जण ठार

एपी, दुबई : इराणच्या आग्नेय भागातील झाहेदान शहरातील एका पोलीस ठाण्यावर सशस्त्र फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड’च्या चार जवानांसह १९ जण मृत्युमुखी पडले. ३२ जण जखमी झाले आहेत. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था ‘इरना’ने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला शुक्रवारी झाला. हल्लेखोर शहरातील एका मशिदीजवळ प्रार्थना करणाऱ्यांत लपले. नंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या हल्ल्ल्यात ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या गुप्तचर विभागाचे प्रमुख सैयद अली मूसावी हे जखमी झाले होते. त्यांचा नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त ‘तश्नीम’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या