उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये गोमांस खाल्ल्याच्या आरोपानं मोहम्मद अखलाखला मारल्याची घटना ताजी असतानाचं गाय तस्कराला जमावाने मारहाण केल्याने ठार झाल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमौर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला.
हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यात दहा बैलांसह पाच गाईंची एका ट्रकमधून तस्करी करण्यात येत होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, ट्रकमधील पाच जण जंगलाच्या दिशेने फरार झाले. मात्र, त्यापैकी एक जण जमावाच्या तावडीत सापडला. त्याला जमावाने बेदर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. नोमान असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो सहारनपूर येथील रामपूर गावात राहत होता. तसेच, नोमानचे इतर साथिदार ट्रकचालक मोहम्मद निशू तसेच गुलजार, सलमान, गुलफाम यांना ताब्यात घेण्यात आले असून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.