तुर्कीची आर्थिक राजधानी असलेल्या इस्तंबूलमध्ये एका निवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या खालच्या मजल्यावर नाईटक्लब होता. या नाईटक्लबमध्ये आग लागल्याचे प्रथामिक वृत्त आहे. या आगीत तब्बल २९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

आग लागली तेव्हा सुरुवातीला १५ मृत आणि आठ जखमी झाले होते. परंतु, बेसिकतास जिल्ह्यातील गायरेटेपे येथे आगीत प्राण गमावलेल्या लोकांची संख्या २९ झाली आहे”, असे राज्यपाल दावूत गुल यांच्या कर्यालयाने स्पष्ट केलं आहे. “आगीत जखमी झालेल्या एका व्यक्तीवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत”, असेही त्यात म्हटले आहे.कार्यालयाने सांगितले की आग दुपारी १२.४७ मिनिटांनी लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ आग नियंत्रणात आणली.

Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
Sharad Pawar
कच्चथिवू बेटावरून शरद पवारांचा मोदींवर पलटवार, म्हणाले, “हयात नसलेल्या इंदिरा गांधींवर…”
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार वरच्या मजल्यावरील खिडक्यांमधून ज्वाला आणि दाट धुराचे लोट दिसत होते. ही आग भीषण असल्याने आगीतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुल यांनी पत्रकारांना सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असताना ही आग लागली होती, येथे नाईट क्लब होता. “गेरेटेपे येथील आगीची चौकशी सुरू करण्यात आली आहे”, असे गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी X वर पोस्ट केले.

या आगीप्रकरणी घटनास्थळी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. इस्तंबूलचे नवनिर्वाचित महापौर एकरेम इमामोग्लू यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले, “आग नियंत्रणात आहे. आशा करूया की आणखी कोणी बळी जाणार नाही.”