चीनमधील मुस्लीम बहुल क्झिनजिआंग प्रांताची राजधानी उरुम्की येथील रेल्वेस्थानकात बुधवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात एकजणाचा मृत्यू आणि ७९ जण गंभीर जखमी झाले. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी संध्याकाळी जोरदार स्फोट झाला. प्रवेशद्वार  आणि  रेल्वेस्थानकाबाहेरील बस थांब्याच्या दरम्यान असलेल्या सामानाजवळ हा शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला.या स्फोटात अनेकजण मरण पावल्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून रेल्वेसेवाही खंडीत करण्यात आली होती.