Premium

एका कारमधून पाचजण आले अन्…, जेएनयूमध्ये ‘या’ दोन घटनांमुळे खळबळ

मुलींना आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मुलींनी आरडोओरडा केला. त्यामुळे हे पाचही आरोपी पळून गेले.

5 men molest try to abduct 2 JNU stroll
जेएनयू विद्यापीठात नेमकं काय घडलं? (संंग्रहित छायाचित्र)

देशाच्या राजधानीत असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतील असे दोन प्रकार घडले आहेत. या दोन घटनांमुळे जेएनयूच्या कॅम्पसमध्ये खळबळ माजली असून अनेक विद्यार्थी भयभीत झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीलाही अटक केल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनयभंग आणि अपहरणाच्या प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार जेएनयू विद्यापीठात घडला आहे. एवढंच नव्हे तर एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचीही माहिती समोर येत आहे. रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान दोन विद्यार्थींनी रात्रीच्या जेवणानंतर चालायला गेल्या होत्या. त्यावेळी कारमधून आलेल्या पाच जणांनी या दोघींचा विनयभंग करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. “कारमध्ये पाच पुरुष दारूच्या नशेत होते. त्यांनी आम्हाला कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला”, असं या मुलींनी तक्रारीत म्हटलं आहे. मुलींना आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मुलींनी आरडोओरडा केला. त्यामुळे हे पाचही आरोपी पळून गेले. या प्रकरणाची तक्रार करण्याकरता पोलिसांना १ वाजता तिसऱ्या विद्यार्थीनीने फोन केला. दरम्यान, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत त्याच ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बुधवारी काळी या मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 15:42 IST
Next Story
Car Sales in May 2023: देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० गाड्यांमध्ये एकट्या मारुतीच्या ‘या’ सात कार्स