सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, २२ पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. भारत-चीन सीमेवर गंगाटोक आणि नाथुलाला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

सिक्कीमचे पोलीस महानिरीक्षक सोनम तेनसिंग भुतिया यांनी सांगितलं की, “या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. हिमस्खलनात ५० पर्यटक अडकले होते. घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक तातडीने बचावकार्यासाठी दाखल झाले,” असं भुतियांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘बाम’ आणि ‘राम’ आमच्या विरोधात एकत्र, पण दंगलखोरांना अद्दल घडवणारच; ममता बॅनर्जींचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटकांना १३ व्या मैलापर्यंत जाण्याची परवानगी आहे. तरी, पर्यटक १५ व्या मैलापर्यंत गेले होते, असं सांगण्यात येत आहे. हिमस्खलनातून २२ जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना सिक्कीमची राजधानी गंगाटोक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अद्यापही बचावकार्याचं काम सुरु आहे.