रशियाचा फार ईस्ट भाग बुधवारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रेतच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे सुनामीचा  इशारा देण्यात आला आहे. कुर्ली बेटापासून भूकंपाचा केंद्रबिंदू जवळ आहे. रशियाच्या स्थानिकवेळेनुसार बुधवारी दुपारी हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कुठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाच्या फार ईस्ट भागापासून ५,६०० किमी अंतरावर असलेल्या हवाईमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण अमेरिकेच्या नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरने हा इशारा मागे घेतला. रशियाच्या साखालीन भागातील सिव्हीरो क्युरीलस्क जिल्ह्यासाठी हा सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

सिव्हीरो क्युरीलस्क एक छोटेस शहर असून, याची लोकसंख्या २५०० आहे. आधी हा भूकंप ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात आले होते. पण रशियाच्या केंद्राने हा भूकंप ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याचे सांगितले. आधीच जगासमोर करोनाचे संकट असताना आता सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 2 magnitude earthquake rocks russias far east sparks tsunami alert dmp
First published on: 25-03-2020 at 11:08 IST