बिहारमध्ये सहरसा जिल्ह्यात पतीच्या चितेवर उडी मारून एका ६५ वर्षीय महिलेने आपले जीवन संपविले. दहवा देवी असे या महिलेचे नाव असून, तिच्या पतीचे शनिवारी कर्करोगाने निधन झाले. रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून सर्व कुटुंबीय व नातेवाईक घरी आले. मात्र घरी आल्यावर दहवा देवी न दिसल्याने मुलांनी शोध घेण्यास सुरुवात केली. स्मशानभूमीजवळ त्या होत्या, असे काही नातेवाईकांनी सांगितल्यानंतर सर्वानी तिकउे धाव घेतली. मात्र तोपर्यंत दहवा देवी यांनी चितेवर उडी मारून जीवन संपविले होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2014 रोजी प्रकाशित
बिहारमध्ये महिला ‘सती’ गेली
बिहारमध्ये सहरसा जिल्ह्यात पतीच्या चितेवर उडी मारून एका ६५ वर्षीय महिलेने आपले जीवन संपविले. दहवा देवी असे या महिलेचे नाव असून, तिच्या पतीचे शनिवारी कर्करोगाने निधन झाले.
First published on: 15-12-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 year old woman commits sati in bihar