कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निधीवर कर्मचाऱ्यांना साडेआठ टक्के व्याज द्यायच्या प्रस्तावावर अर्थमंत्रालय या आठवडय़ात शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. याचा लाभ पाच कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
ईपीएफओवर साडेआठ टक्के व्याज देण्याच्या निर्णयावर प्रदीर्घ काळ निर्णय होत नसल्याचा मुद्दा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे नुकताच मांडला होता. त्यावर या आठवडाभरात हा निर्णय अर्थखात्याकडून होईल, असे आश्वासन देण्यात आले.