Gas Tanker Explodes In South Africa: दक्षिणे आफ्रिकेतील बोक्सबर्गमध्ये एलीपीजी टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे गॅस टँकर एका अंडरपासमध्ये अडकल्यानंतर झालेल्या गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.बोक्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील गौटँग प्रांतामधील एक शहर आहे. आज(शनिवार) सकाळी गॅस टँकर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर मोठो स्फोट झाला. हा भीषण स्फोट ओआर टँबो मोमोरियल रूग्णालयापासून काही अंतरावर झाला. हा टँकर एलपीजीचा होता. भीषण स्फोटानंतर नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्फोटानंतर आपत्कालीन व्यवस्था पथकं घटनास्थळी तातडीने दाखल झाली, जखमींना रुग्णलयात नेण्यात आले. यापैकी काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर येत आहे.