शिकागो विद्यापीठात शिकणाऱ्या एका मुस्लीम विद्यार्थ्याने अमेरिकेबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. अमेरिका हा देश आपल्याला इस्लामिक राष्ट्र करायचा आहे असंही त्याने म्हटलं आहे. या विद्यार्थ्यांचं विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे. मोहम्मद नुसैरात असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याने अमेरिकेला कॅन्सरची म्हणजेच कर्करोगाचीही उपमा दिली आहे.

काय म्हटलं आहे मोहम्मदने?

“अमेरिका, अमेरिकन सरकार, सेक्युलॅरिझम, लोकशाही, चंगळवाद हे कॅन्सर आहेत. मिडल ईस्टसह सगळ्या जगात हा कॅन्सर पसरला आहे. या ठिकाणी असलेली लोकशाही सडून गेली आहे. अमेरिकेत शरिया कायदा आणला पाहिजे. आता आपण सगळे याच देशात राहायचं आहे. आपल्या देशात परतायचं नाही. अमेरिका हा इस्लामिक राष्ट्र किंवा मुस्लीम राष्ट्र झाली पाहिजे. आपल्याला ते लक्ष्य साध्य करायचंच आहे.” असं मोहम्मदने म्हटलं आहे. हा व्हिडीओ ३ मे चा आहे जो चांगलाच व्हायरल होतो आहे.

हे पण वाचा- “देवावर हसणं म्हणजे निंदा नाही, पण विनोद…” पोप फ्रान्सिस विनोदी कलाकारांना काय म्हणाले?

मुस्लीम धर्म न्याय आणि सलोखा मानणारा

“मुस्लीम धर्म न्याय आणि सलोखा मानणारा धर्म आहे. मुस्लीम लोक आता अमेरिका नावाच्या कॅन्सरसारख्या देशाला कंटाळाले आहेत. इथल्या सरकारचा, लोकशाहीचा त्यांना उबग आला आहे. आयुष्य जगण्यासाठी त्यांना नव्या जीवनशैलीची गरज आहे. मुस्लीम समुदाय हा न्याय आणि सलोखा जपणारा धर्म आहे. मुस्लीम दयाळू असतात. न्याय आणि समता मानणारा हा धर्म आहे. बिगर मुस्लीम समाजाने याबाबत विचार करु नये. मात्र हा असा धर्म आहे जो समाज अंगिकारु शकतो.” असंही मोहम्मदने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मदला नेटकरी देत आहेत देश सोडण्याचा सल्ला

मोहम्मद नुसरैतच्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये दिलेल्या माहितीनुसार तो तो बॅचलर ऑफ सायन्सचा विद्यार्थी आहे. त्याने मुस्लीम विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात अमेरिकेला कॅन्सर असं संबोधलंय. इस्लाम हा एकमेव असा धर्म आहे जो समाज अंगिकारु शकतो. आपण त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. मोहम्मद नुसरैतचं हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडीमार केला जातो आहे. त्याला देश सोडून जायचा सल्ला अनेकजण देत आहेत. आमचा देश सोडून जा आणि पुन्हा या देशात पाऊल ठेवायची गरज नाही असं नेटकरी त्याला सांगत आहेत. त्याचा स्कॉलरशिप आणि विद्यार्थी व्हिसा तातडीने रद्द केला पाहिजे अशीही मागणी काहींनी केली आहे. अमेरिका तुला कॅन्सर वाटते तर कशाला इथे राहतोस? असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.