२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाला आपलं आव्हान टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. लीड्सच्या मैदानावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सामना सुरु होण्याआधीच मैदानाबाहेर एक वेगळाच प्रसंग पहायला मिळाला. सामना पाहण्यासाठी आलेले अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी चाहते मैदानाबाहेरच भिडले. याला कारण ठरलं आहे विमान. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामना सुरु होण्याआधी लीड्सच्या मैदानावरुन दोन विमानं फिरली ज्यातील एका विमानावर Justice for Baluchistan असा संदेश लिहीलेला होता.

यानंतर दोन्ही देशांमधील चाहत्यांमध्ये वादाची ढिणगी पडली. बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकार स्थानिकांवर करत असलेल्या जुलमी कारवाईविरोधात हा संदेश विमानावर लिहीला गेल्याचं बोललं जातंय. या विमानावरील संदेशावरुन, सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये चांगलीच जुंपली. दोन्ही देशांच्या चाहत्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. काही अफगाण समर्थकांकडून पाकिस्तानी पत्रकारांवरही शेरेबाजी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या घटनेची आयसीसीने दखल घेतली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यात आलं असून या प्रकऱणाची चौकशी केली जाईल असं आश्वासन आयसीसीने दिलं आहे.