लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात राजबरेली मतदारसंघातून लढण्यास आम आदमी पक्षाच्या नेत्या शाजिया इल्मी यांनी नकार दिला आहे.
त्यामुळे केजरीवालांच्या ‘आप’मध्ये पुन्हा एकदा जागावाटपावरून नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे.
शाजिया इल्मी यांनी दिल्लीतून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. काही वैयक्तिक कारणास्तव रायबरेलीतून निवडणूक लढवू शकत नसल्याचे शाजिया इल्मींचे म्हणणे आहे.
तसेच पक्ष प्रवेशानंतर एकाही महत्वाच्या नेत्याने संपर्क साधला नसल्याने इतर ‘आप’ नेतेही नाराज असल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर आम आदमीत पसरलेली नाराजी केजरीवाल कशी थोपवितात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.