अल्पवयीन आरुषी आणि हेमराज यांच्या दुहेरी  हत्येप्रकरणी सीबीआयच्या न्यायालयाने निकाल मंगळवारी राखून ठेवला असून तो आता २५ नोव्हेंबर रोजी देण्यात येईल. याप्रकरणी आरुषीचे आई-वडील नूपुर आणि राजेश तलवार हे मुख्य आरोपी आहेत.
बचाव पक्षाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद संपविल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्यामलाल यांनी हा निकाल मंगळवारी राखून ठेवला. या जोडप्यानेच आपली कन्या व नोकराची हत्या केली असून परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्याविरोधात आहेत, असे सांगत सीबीआयने आपली भूमिका स्पष्ट केली. तर आपल्या अशिलास याप्रकरणी नाहक गुंतविण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.