scorecardresearch

मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कोठडीतून फरार

टिनूला गोविंदवाल साहिब कारागृहातून दुसऱ्या कारागृहात अन्य खटल्यातील सुनावणीसाठी आणण्यात आले होते.

मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कोठडीतून फरार
सिद्धू मूसेवाला

चंडीगड : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक असलेला कुख्यात गुंड दीपक टिनू पोलीस कोठडीतून शनिवारी फरार झाला. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात ही घटना घडली.

पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. मानसा जिल्ह्यातच २९ मे रोजी लोकप्रिय गायक शुभदीपसिंग सिद्धू ऊर्फ सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी आप सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे.

टिनूला गोविंदवाल साहिब कारागृहातून दुसऱ्या कारागृहात अन्य खटल्यातील सुनावणीसाठी आणण्यात आले होते. राजस्थान, हरियाणा या लगतच्या राज्यांच्या पोलिसांना टिनूची माहिती देण्यात आली आहे. सध्या कैदेत असलेला आणि मुसेवाला हत्याप्रकरणातील अन्य आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा तो जवळचा साथीदार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या