आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विनोद बिन्नी यांनी पक्षावर आणि पक्षांतर्गत कारभारावर केलेले आरोप बेताल आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया आपचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली. तसेच असे तथ्यहीन आरोप करणाऱ्या बिन्नींविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही पक्षात मतभेद हे असायचेच, त्यात वावगे काहीच नाही. आम आदमी पक्षातही असे मतभेद असण्याबद्दल आमचा आक्षेप नाही. पण मतभेद असणे आणि बेशिस्त वर्तन यात तफावत आहे. बिन्नी यांचे वर्तन पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे, त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असे यादव म्हणाले.
विनोद बिन्नी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘हुकूमशहा’ असल्याची तसेच लोकांना निवडणुकीपूर्वी दिलेली वचने आप पाळत नसल्याची टीका केली होती. पक्षाने सत्ता हाती घेताना काँग्रेसचा पाठिंबा घेतला खरा, पण त्यासाठी त्यांनी पक्षाच्या तत्त्वांशी तडजोड स्वीकारली, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला होता.
त्यावर प्रतिक्रया देताना, बिन्नी यांच्याकडून कोणीतरी वदवून घेत असल्यासारखे ते बोलत होते, असे योगेंद्र यादव म्हणाले. गेले काही दिवस विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन ज्या पद्धतीने टीका करीत होते, त्याच शब्दांमध्ये बिन्नी यांनी टीका केली आहे. बिन्नी यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली. खरे पाहता, असे मुद्दे पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या बैठकीत असे आक्षेप व्यक्त करणे सुसंस्कृतपणाचे ठरले असते, मतही योगेंद्र यादव यांनी यावेळी व्यक्त केले.
‘आप’कडून दिल्लीकरांची फसवणूक -बिन्नी
बिन्नी यांनी गुरुवारी पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांवर पुन्हा एकदा टीका केली. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपासून फारकत घेऊन पक्षाने दिल्लीकरांची फसवणूक केली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ‘हुकूमशहा’ आहेत, असा हल्ला बिन्नी यांनी चढविला आहे. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेणे ही पक्षाच्या तत्त्वांशी केलेली तडजोडच आहे असा हल्ला चढवला.प्रत्येक घरात ७०० लिटर पाणीपुरवठा मोफत केला जाईल, अशी घोषणा केली मात्र ज्या घरात या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांच्याकडून पूर्ण पाणीपट्टी वसूल केली जाईल, असे सरकारने अत्यंत चलाखीने घोषित केल्याचा आरोपही केला.
‘आप’ विरूध्द ‘आप’; पक्षाने दिल्लीकरांना धोका दिल्याचा बिन्नींचा आरोप
‘आम आदमी’ आणि माझ्यात मतभेद नाहीत; बिन्नी यांचे स्पष्टीकरण
दिल्लीत ‘आप’ च्या आमदाराचे बंड?
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
बिन्नी यांचे आरोप ‘आप’ने फेटाळले ;कारवाई शक्य
आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विनोद बिन्नी यांनी पक्षावर आणि पक्षांतर्गत कारभारावर केलेले आरोप बेताल आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया आपचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली.

First published on: 17-01-2014 at 12:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against aap mla binny