scorecardresearch

देशात उपचाराधीन रुग्णांच्या प्रमाणात वाढ ; रुग्णवाढीचा दर २०.७५ टक्क्यांवर

दैनंदिन रुग्णवाढीचा दर वाढून २०.७५ टक्क्यांवर गेला  आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १७.०३ टक्के आहे,

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर वाढून तो २०.७५ टक्क्यांवर गेला असून रुग्ण करोनामुक्त होण्याचा राष्ट्रीय दर ९३.०७ टक्क्यांवर घसरल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत गेल्या २४१ दिवसांत प्रथमच सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली.

सध्या देशात २२ लाख ४९,३३५ रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांची संख्या ६२,१३०ने वाढली आहे. सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या २४१ दिवसांतील सर्वोच्च आहे.    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार देशात ३,०६,०६४ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी ९५ लाख ४३,३२८ एवढी झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या २२ लाख ४९,३३५ असून २४१ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे.  गेल्या २४ तासांत ४३९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण करोना बळींची संख्या चार लाख ८९,८४८ झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या ५.६९ टक्के असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३.०७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर वाढून २०.७५ टक्क्यांवर गेला  आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १७.०३ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Active covid patients increased for the first time in the last 241 days zws

ताज्या बातम्या