तेलंगणातील काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी अभिनेत्री पुनम कौर यांचा हात धरल्याचा फोटो बराच व्हायरल झाला आहे. या फोटोवर भाजपा नेत्याकडून अपमानास्पद प्रतिक्रिया देण्यात आली आहे. या टीकेला सडेतोड उत्तर देत पुनम कौर यांनी या फोटोबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यात्रेत पाय घसरून पडताना वाचवण्यासाठी राहुल गांधींनी आपला हार धरल्याचं कौर यांनी म्हटलं आहे. “‘अशाप्रकारची टीका तुमचाच अवमान करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नारीशक्ती विषयी बोलले होते याची आठवण ठेवा” असं प्रत्युत्तर कौर यांनी भाजपाच्या प्रीती गांधी यांना दिलं आहे.

आमदार खरेदीबाबतची कथित ध्वनिफीत ‘आप’कडून उघड; अमित शहा दोषी असतील तर अटक करण्याची सिसोदिया यांची मागणी


राहुल गांधी आणि पुनम कौर यांचा ‘भारत जोडो’ यात्रेतील फोटो प्रीती गांधी यांनी ट्वीट केला होता. “ते त्यांच्या पणजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत” असे या ट्वीटमध्ये गांधी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसनं समाचार घेतला आहे. प्रीती या विकृत आणि मानसिकदृष्ट्या आजारी आहेत, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

राहुल गांधी खरोखरच पणजोबांच्या पावलावर पाऊल टाकत देशाला एकजुट करत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रीती गांधी यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी दिली आहे. “तुम्हाला उपचारांची गरज आहे. तुमची मानसिक स्थिती तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्र मंडळीसाठी घातक ठरू शकते”, असं टीकास्र पवन खेरा यांनी डागलं आहे.

गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची धूम; लिंग गुणोत्तर, साक्षरतेची काय स्थिती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही प्रीती गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि हातात हात घालून स्त्रिया देशाला बळकट करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी चालत आहेत, तर यामुळे केवळ पं. नेहरुंचेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यसैनिकांचे समान भारताचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही कृपया गप्प बसा”, असे ट्वीट चतुर्वेदी यांनी केले आहे. भाजपाच्या प्रीती गांधी या महिलांचं खच्चीकरण करणाऱ्या विचारसरणीच्या बळी ठरल्या आहेत, अशी टीका काँग्रेस खासदार जोतीमणी यांनी केलीय.