ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत अभिनेत्री नफिसा अली यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत अभिनेत्री नफिसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

mamata
(फोटो सौजन्य – ट्विटर)

गोव्यात पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत अभिनेत्री नफिसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमुल काँग्रेस २०२२च्या गोवा विधानसभा निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहे. ममता बॅनर्जी गुरुवारी संध्याकाळी गोव्यात आल्या आहेत. ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दाबोलीम विमानतळावर त्यांचे तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन आणि स्थानिक नेत्यांनी स्वागत केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “गोवा आणि पश्चिम बंगालला फुटबॉल आवडतो. पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये आमचा नारा ‘खेला होबे’ होता. यावेळी आम्हाला गोव्यात नवी पहाट पहायची आहे. ममता गोव्यात नवीन पहाट कशी करणार, असं म्हणत असाल तर मी कुठेही जाऊ शकते. माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे,” असं ममता बॅनर्जी गोव्यात बोलताना म्हणाल्या.

“माझं शेतकऱ्यांवर, मच्छिमारांवर, इथल्या खाणींवर आणि संपूर्ण गोव्यावर प्रेम आहे. मी पहिल्यांदाच राजकीय हेतूने गोव्यात आलेली नाही. मी यापूर्वी देखील गोव्याला भेट दिली आहे. मी तीन वर्षांपूर्वी गोव्याला आले होते. मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मी इथे तुमच्या राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी आलेली नाही. लोकांना अडचणी येतात तेव्हा आपण त्यांना मदत करू शकलो, तर त्याचा मला आनंद आहे. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही तुम्हाला प्रक्रियेत मदत करू,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress nafisa ali and mrinalini deshprabhu join trinamool congress in the presence of mamata banerjee hrc

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या