जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिद याच्याविरोधात दिल्ली दंगलप्रकरणी करण्यात आलेल्या षडयंत्राच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वेळेअभावी खालिदची जामीन सुनावणी तहकुब करण्याविषयी म्हटलं. यानंतर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद केलेला पाहायला मिळाला. उमर खालिद पीएचडीधारक विद्यार्थी असून मागील तीन वर्षांपासून तुरुंगात असल्याचं लक्षात आणून देत सिब्बल यांनी सुनावणी आजच घेण्याची विनंती केली. तसेच २० मिनिटात हा खटलाच होऊ शकत नाही हे सिद्ध करेन, असंही नमूद केलं.

कपिल सिब्बल म्हणाले, “उमर खालिद एक पीएचडीधारक तरुण विद्यार्थी आहे. तो मागील तीन वर्षांपासून तो तुरुंगात आहे. त्याच्याविरोधातील आरोपपत्र निश्चित करण्याची काहीही शक्यता दिसत नाहीये. त्याला किती दिवस तुरुंगात ठेवलं जाणार आहे?”

Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

“केवळ षडयंत्राचे आरोप करण्याला कोणतंही कलम लागू होत नाही”

“उमर खालिदने कधीही मर्यादेबाहेर जाऊन कृती केलेली नाही. हे त्यांनीही मान्य केलं आहे. ते केवळ एक षडयंत्र झाल्याचं म्हणत आहेत. मात्र, षडयंत्र कशाचं? यासाठी कोणतंही कलम लागू होत नाही,” असं मत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : सत्तासंघर्षाच्या ३४ याचिकांच्या एकत्रित सुनावणीवर घटनातज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले, “वकील नसलेला…”

“मी २० मिनिटात हा खटलाच होऊ शकत नाही हे सिद्ध करेन”

सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर खंडपीठाने वेळेअभावी सुनावणी तहकुब करण्याबाबत म्हटलं. यावेळी सिब्बल यांनी खंडपीठाला या प्रकरणाची सुनावणी आजच घ्या, अशी विनंती केली. तसेच मी २० मिनिटात हा खटलाच होऊ शकत नाही हे सिद्ध करेन, असंही नमूद केलं.

दिल्ली उच्च न्यायालयाने उमर खालिदचा जामीन नाकारला. याला उमर खालिदने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी हे प्रकरण आलं. मात्र, खंडपीठाने सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १ नोव्हेंबरला ठेवली. तसेच त्या दिवशी हे प्रकरण पहिल्या पाच प्रकरणांमध्येच समाविष्ट करून सुनावणी घेतली जाईल, असं नमूद केलं.