राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. त्यामुळेच त्यांना तुमच्या मुलांची संपत्ती काढून घ्यायची आहे. तसेच काँग्रेसला तुमच्या मुलांची संपत्ती मुस्लिमांना द्यायची आहे, असं विधान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. शनिवारी हिमाचल प्रदेशातील हमीरपू येथे एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. ठाकूर यांच्या या विधानानंतर आता देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसनेही अनुराग ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं असून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय म्हणाले अनुराग ठाकूर?

हिमाचल प्रदेशातील हमीरपू येथील प्रचारसभेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेसच्या हातासह विदेशी शक्तींचे हातही दिसत आहेत, ज्यांना तुमच्या मुलांची संपत्ती मुस्लिमांना द्यायची आहे. देशाची अण्वस्त्रे नष्ट करायची आहेत. जातीवाद आणि प्रादेशिकवादाचा मुद्दा उपस्थित करून देशात फूट पाडायची आहे. असे ते म्हणाले.

Jayant Patil
“पिपाणी चिन्हामुळे आम्हाला…”, जयंत पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “साताऱ्याची जागा…”
Priyanka Gandhi Tweet After Smriti Irani Defeat Amethi Kishori Lal Sharma
अमेठीत राहुल गांधींना जिंकू देणार नाही म्हणणाऱ्या स्मृती इराणी पराभूत, प्रियांका गांधी म्हणतात…
reasons given by Congress leaders for ignoring pm narendra modis statement about Gandhi
गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे
Priyanka Gandhi asked Prime Minister Narendra Modi why there is no prosperity in people lives
जनतेच्या जीवनात समृद्धी का नाही? पंतप्रधानमोदी यांना प्रियंका गांधी यांचा सवाल
What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “मी कधीही मुलगी आणि पुतण्या भेद केला नाही, आत्तापर्यंत अजित पवारांना..”
Sunil Tatkare, advice, Hemant Godse,
संभ्रम करणारी विधाने टाळावीत, सुनील तटकरे यांचा हेमंत गोडसे यांना सल्ला
Sharad Pawar criticizes to PM Narendra Modi
“…तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”; शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
BJP silence on Mayawati sparks discussion
मायावतींवर भाजपाचे मौन, भाच्याला अचानक पदावरून दूर केल्यानंतर ‘बी टीम’च्या चर्चेला उधाण

हेही वाचा – पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या माजी प्रमुखाला अटक…

“देशातील तुकडे-तुकडे टोळीने काँग्रेसला पूर्णपणे घेरले आहे. काँग्रेसची विचारधारा त्यांनी हायजॅक केली आहे. तुम्हाला काँग्रेसच्या ‘तुकडे-तुकडे’ टोळीबरोबर जायचे की ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ मानणाऱ्या नरेंद्र मोदींबरोबर जायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुमच्या मुलांची संपत्ती त्यांच्याकडे राहील, की मुस्लिमांकडे जाईल, हेसुद्धा तुम्हीच ठरवायचे आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

“राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा ५५% संपत्ती सरकारकडे जाईल, असा कायदा होता. त्यांनी तो कायदा रद्द करून आपली संपत्ती वाचवली. मात्र, आता राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. त्यामुळेच त्यांना तुमच्या मुलांची संपत्ती काढून घ्यायची आहे.”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – समोरच्या बाकावरून: मोदींनी दिली काँग्रेसला मानवंदना!…

अनुराग ठाकूर यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

दरम्यान, अनुराग ठाकूर यांच्या टीकेला काँग्रेसही प्रत्युत्तर दिलं आहे. अनुराग ठाकूर यांनी केलेली टीका म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन आहे, असं म्हणत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, अनुराग ठाकूर हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीदेखील केली आहे.