करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अलहाबाद उच्च न्यायालयान केंद्र सरकारकडे उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका शक्य झाल्यास पुढे ढकल्यावर अशी विनंती केलीय. लोकांचे प्राण हे अधिक महत्वाचे असल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं. निवडणूक प्रचारसभांच्या माध्यमातून ओमायक्रॉनचा धोका अजून वाढू शकतो. याच्यावर आताच नियंत्रण मिळवलं नाही तर भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, असं सांगत न्यायालयाने निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
न्यायालयाच्या या विनंतीनंतर आता निवडणूक आयोगाने संबंधित विषयावर प्रतिक्रिया दिलीय. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी निवडणूक कधी घ्यायची यासंदर्भात पुढील आठवड्यामध्ये निर्णय घेतला जाईल असं म्हटलं. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्य निवडणूक आयुक्त पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. ते या दौऱ्यामध्ये राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतली. त्यानंतर तेथील परिस्थिती पाहून त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याची गरज आहे असं वाटल्यास त्यासंदर्भाने आयुक्त निर्णय घेतील असं सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा >> भारतात करोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनमुळे येणार, IIT च्या संशोधकांचं भाकित; तारीखही सांगितली
पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. उत्तर प्रदेशबरोबरच उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्येही निवडणूक होणार आहे. अशामध्ये ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता या कालावधीत निवडणूक ठेवं अधिक घातक ठरु शकतं. निवडणुकीसाठी नेत्यांचे दौरे, प्रचारसभांमध्ये लोकांची उपस्थिती यासारख्या गोष्टींमुळे संसर्गाचा धोका आणखीन वाढू शकतो.
नक्की वाचा >> “मोदी उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात आणि दिल्लीत येऊन करोनाबद्दल चिंता व्यक्त करतात; ‘रात्रीस खेळ चाले’चा प्रयोग…”
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता लागू करू शकतं तर त्यांनी राज्यामध्ये निवडणूक कधी व कशी घ्यावी यासंदर्भातील निर्णय घेणं योग्य ठरेल असं मत व्यक्त केलेलं.