Ahmedabad Plane Crash Pilots: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला. एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ या विमानाने दुपारी १.३८ मिनिटांनी विमानतळाहून उड्डाण घेतले. मात्र अवघ्या काही मिनिटांतच ते कोसळले. या विमानात २३२ प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू सदस्य असे एकूण २४२ लोक होते. ज्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगिज नागरिक होते. या अपघातात विश्वासकुमार रमेश या एकमेव प्रवाशाचा जीव वाचला.

सदर अपघाताची चौकशी करण्यात येत असली तरी अद्याप अपघाताचे ठोस कारण कळू शकलेले नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) या अपघाताची चौकशी करत असून एएआयबीने आपला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.

एअर इंडियाच्या विमानात वैमानिक कोण होते?

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात दोन वैमानिक होते. कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्यासह फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर विमानात होते. दोन्ही वैमानिकांना एकत्रितपणे ९,३०० तास उड्डाणाचा अनुभव होता. यापैकी एकट्या सभरवाल यांचा ८,२०० तास उड्डाणाचा अनुभव होता. तर कुंदर यांना १,१०० तास उड्डाणाचा अनुभव होता.

वैमानिकांशिवाय विमानात १० क्रू सदस्य होते. विमानाने उड्डाण घेताच वैमानिकांनी मेडे (MAYDAY) असा संदेश एअर ट्राफिक कंट्रोलला पाठवला होता. मात्र त्यानंतर त्यांचा काहीच प्रतिसाद मिळू शकला नाही. उड्डाण घेतल्यानंतर पाचच मिनिटांनी विमान कोसळल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. विमान कोसळल्यानंतर प्रथम आगीचा मोठा लोळ हवेत दिसला. त्यानंतर काळ्या धुराचे लोट परिसरात दिसले.

मेघानी नगर परिसरातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले. या दुर्घटनेमुळे वसतिगृहाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या धडकेमुळे या इमारतीमधील अनेक लोक जखमी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताजी अपडेट

आज १२ जुलै रोजी विमान अपघात तपास ब्युरोने महिन्याभरापूर्वी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा चौकशी अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये विसंवाद झाल्याचे म्हटले आहे. सविस्तर वृत्त इथे वाचा