सरकारी उडाण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवेनुसार विमानांचे तिकीट दर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलणार आहेत. उडाण (उडे देश का आम नागरिक) या योजनेंतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेष सेवा द्याव्यात, असे केंद्र शासनाने सांगितले होते. त्यासाठी या कंपन्यांना अनुदान दिले जात होते. या अनुदानातही सरकारकडून बदल होणार असल्याने तिकीट दरात बदल होणार असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले.

या योजनेंतर्गत ठरविल्या जाणाऱ्या प्रवासी भाडयांची मर्यादा ठरलेली आहे. तसेच या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या एअरलाईन कंपनीला व्यावहारिक रुप देण्यासाठी निधी देण्यात येतो. या निधीबाबत होणाऱ्या संशोधनानुसार प्रवासी भाड्यात बदल होणार आहे. नागरी विमान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे दर तिकिटांची किंमत, डॉलरमध्ये होणारा बदल आणि प्रत्यक्ष व्यावहारिक मूल्य यावर ठरविण्यात येणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश ज्या ठिकाणी विमानप्रवास कमी होत असलेल्या विमानतळांना जोडणे तसेच लोकांना कमी दरात विमान प्रवास उपलब्ध करुन देणे हा आहे. या सेवेंतर्गत पहिले उड्डाण शिमला ते दिल्ली असे सुरु करण्यात आले आहे. पुढील मार्गावरील सेवाही लवकरच सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. प्रतितास २५०० रुपये असे या तिकिटांचे दर ठरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उडाण अंतर्गत सेवा देत असलेल्या कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना ठराविक मार्गावरील ठराविक जणांना तिकीट ५० टक्के सवलतीने द्यावे असेही मंत्रालयाने सांगितले आहे. सध्या ५ कंपन्यांचा यामध्ये समावेश असून १२८ मार्ग आणि ७० विमानतळे याअंतर्गत जोडण्यात आली आहेत.