उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथील अडीच वर्षांच्या मुलीच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती आहे. या प्रकरणी अटक झालेल्या झाहीद (वय २७) आणि अस्लम (वय ४२) या दोघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अलीगढमधील टप्पल परिसरात राहणारी अडीच वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. २ जून रोजी तिचा मृतदेह गावाबाहेरील कचराकुंडीजवळ सापडला होता. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला होता. मात्र शवविच्छेदनात मुलीवर बलात्कार झाला नाही, हे स्पष्ट झाले. मुलीची निर्घृणपणे करण्यात आली. मुलीच्या वडिलांसोबत झाहीद आणि अस्लम यांचा पैशांचा वाद होता आणि या वादातूनच त्यांनी अडीच मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

अलीगढमधील या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. तसेच फॉरेन्सिक नमुने तपासणीसाठी आग्रा येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अलीगढमध्ये जी घटना घडली ती अमानवी आणि क्रौर्याचा कळस गाठणारी घटना आहे. आपण हा कसा समाज तयार करतो आहोत? त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय वाटत असेल याचा विचार केला तरीही अंगावर काटा येतो. जे अपराधी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली. तर “अलीगढमध्ये घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे मी विचलित झालो आहे. एखाद्या लहान मुलीची इतकी क्रौर्याने हत्या करायला माणसांचे हात कसे काय धजावतात? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणी न्याय झालाच पाहिजे”, अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केले.