गोव्याची ओळख पोर्तुगाल, ब्राझील आणि पश्चिमेकडील रोममध्ये देखील आहे. गोवा नेहमीच या वेगळ्या ओळखीमुळे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे विशेष केंद्र राहिले आहे. समुद्रकिनारी असलेल्या राज्याची आणखी एक खास ओळख आहे आणि ती म्हणजे येथील स्थानिक दारू ‘फेणी’. या फेणी दारुचा जीवन प्रवास सांगण्यासाठी संग्रहालय तयार केलं गेलं आहे. अशाप्रकारचे देशातील पहिलेच अल्कोहोल संग्रहालय आहे. झी न्युजने वृत्तसंस्था IANS च्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

स्थानिक व्यावसायिक नंदन कुडचडकर यांनी गोव्याच्या कंडोलिम गावात हे संग्रहालय बांधले आहे. कुडचडकर यांनी संग्रहालयाला ‘ऑल अबाऊट अल्कोहोल’ असे नाव दिले आहे. या अल्कोहोल संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे काजूपासून बनवलेली दारु साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलाकृती मर्तबान (चिनी मातीपासून बनलेल्या गोलाकार भांड्याचा हा एक प्रकार आहे), जार शतकांपासून वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक काचेच्या भांड्यात दारु ठेवल्या जाते.

‘ब्राझील ते गोवा’ मद्याशी संबंधित प्रवासाची कहाणी

आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नंदन कुडचडकर म्हणतात, संग्रहालय तयार करण्यामागे एक संदेश आहे. ज्यात गोव्याच्या विशेष सांस्कृतिक वारशाची कथा, विशेषत: फेणीची सुरुवात आणि ब्राझील ते गोवा या मद्याशी संबंधित प्रवासाची कहाणी सांगायची आहे.

इतिहासकारांच्या मते, गोव्यातील पहिले काजूचे झाड पोर्तुगीजांनी १७०० मध्ये ब्राझीलमधून आणले होते. ब्राझील आणि गोवा या दोन्ही देशांमध्ये ल्युसोफोनियन कलोनियलचा प्रभाव आहे. येथे, जेव्हा ब्राझीलमधून आणलेले काजूचे रोप गोव्याच्या भूमीवर लावले गेले, तेव्हा काजूसह फेणी दारूनेही गोव्याच्या खाद्य संस्कृतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

हेही वाचा – Video: पिझ्झा बेस म्हणून चक्क कलिंगड वापरले; डॉमिनोजनेही ट्राय केली रेसिपी

पारंपारिक मद्य

फेणी हा एक प्रकारचा पारंपारिक मद्य आहे, जो काजू फळापासून तयार केला जातो. यामध्ये कोणतेही सेंद्रिय किंवा कृत्रिम पदार्थ वापरले जात नाहीत. फेणी हे नाव फेणा या संस्कृत शब्दातून आला आहे. गोव्यात त्याची प्रथा सुमारे ५०० वर्षे जुनी आहे. असे म्हटले जाते की इतर अल्कोहोलप्रमाणे फेणी प्यायल्याने हँगओव्हर होत नाही. २००९ मध्ये गोवा सरकारने फेणीला जियोग्राफिकल इंडिकेशन प्रमाणपत्र दिले. २०१६ मध्ये गोवा सरकारने त्याला हेरिटेज ड्रिंकचा दर्जा देण्याची प्रक्रियाही सुरू केली होती.

हेही वाचा – धक्कादायक: पाणीपुरीच्या पाण्यातच केली लघवी; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन प्रकारच्या फेणी सर्वाधिक लोकप्रिय

गोव्यात विशेषतः दोन प्रकारच्या फेणी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. एक काजू फेणी आणि दुसरा नारळ फेणी. नारळ फेणीची प्रथा काजू फेणीपेक्षा खूप जुनी आहे. गोव्यात नारळाची उपलब्धता भरपूर होती, म्हणूनच येथे प्रथमच नारळापासून फेणी तयार केली गेली. मात्र, पोर्तुगालहून येणाऱ्या लोकांनी इथे काजूपासून फेणी बनवायला सुरुवात केली.