राष्ट्रीय तौहीद जमात या संघटनेने श्रीलंकेत ईस्टर संडेला आठ शक्तिशाली बॉम्ब स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. पूर्व श्रीलंकेत २०१४ साली मुस्लिम बहुल काट्टानकुडी येथे या संघटनेची स्थापना करण्यात आली. ही एक कर्मठ इस्लामिक संघटना म्हणून ओळखली जाते. शरीया कायदा आणण्याची तसेच महिलांनी फक्त बुरख्यामध्येच राहिले पाहिजे अशी या संघटनेची मागणी आहे.

याआधी या संघटनेकडून कधीही जनसमुदायावर हल्ला झालेला नाही. वंशवाद आणि इस्लामिक श्रेष्ठतेसाठी ही संघटना ओळखली जाते. बुद्ध मूर्तीची तोडफोड केल्या प्रकरणी मागच्यावर्षी ही संघटना सर्वप्रथम चर्चेत आली होती. या संघटेच्या कारवायांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुद्धांबद्दल मानहानिकारक वक्तव्ये करुन भावना दुखावल्या प्रकरणी २०१७ साली राष्ट्रीय तौहीद जमातच्या सदस्यांवर कारवाई करण्यात आली होती. जेरुसलेम पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार कट्टरपंथीय मौलवी झाहरान हाशिम हा शांगरी ला हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाचा सूत्रधार आहे. राष्ट्रीय तौहीद जमातमध्ये तो व्याख्यान द्यायचा.