गुजरात : माजी काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर, धवलसिंह झाला भाजपात

गुजरात भाजपा अध्यक्ष जितू वाघाणी यांच्या उपस्थित प्रवेश

गुजरातमधील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकुर आणि आमदार धवलसिंह झाला यांनी आज गुजरात भाजपा अध्यक्ष जितू वाघाणी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वीच या दोघेजण लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती, गुजरात क्षत्रिय ठाकोर सेनेचे अमित ठाकोर यांनी पत्रकारपरिषदेत दिली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला भाजपाच्या विचारधारेवर विश्वास असल्याचेही सांगितले होते.

तर, अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह जाला यांनी राज्यसभा पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर गुजरात विधानसभेचा राजीनामा दिला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Alpesh thakor dhaval singh zala join bjp msr