काश्मीर खोऱ्यातील खराब वातावरणामुळे स्थगित झालेली अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. काल ( मंगळवार ५ जुलै ) खराब वातावरणामुळे बालटाल आणि पहेलगाम हे दोन्ही मार्ग यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आले होते.

४३ दिवस चालणारी ही यात्रा ३० जून रोजी सुरू झाली होती. करोनामुळे गेली दोन वर्ष ही यात्रा बंद करण्यात आली होती. मात्र, यंदा सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी ६५ हजारांच्यावर भाविक अमरनाथ यात्रेत सहभागी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे यात्रेकरून बाबा अमरनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी गुहेच्या दिशेने रवाना होणार आहे. बाबा अमरनाथ यांची गुफा ही समुद्रसपाटीपासून ३८८८ मीटर उंचीवर आहे. उत्तर काश्मीरमधील बालटाल मार्ग वापरणार्‍यांना गुहेत पोहोचण्यासाठी १४ किमीचा प्रवास करावा लागणार आहे. तर दक्षिण काश्मीर पहलगाम मार्गाने गुहेच्या मंदिराकडे जाणाऱ्यांना गुहेत जाण्यासाठी ४ दिवसांत ४८ किमीचा प्रवास करावा करावा लागणार आहे. यात्रेकरूंसाठी दोन्ही मार्गांवर हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे.