scorecardresearch

दोन वर्षानंतर अमरनाथ यात्रेला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ ; ३० जूनपासून सुरू होणार ४३ दिवसांची यात्रा

यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

(संग्रहीत छायाचित्र)

करोना महामारीमुळे खंड पडलेली अमरनाथ यात्रा यंदा ३० जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान सर्व भाविकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. त्याचवेळी, जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार आहे.

दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती. मात्र, या काळात पवित्र गुहेत बाबा अमरनाथ यांची पूजा पारंपरिक पद्धतीने वैदिक मंत्रोच्चाराने सुरू होती.

आता देशात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने आज (रविवार) या यात्रेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amarnath yatra to start from june 30 got the green signal after two years msr

ताज्या बातम्या