जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणारं अॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा पसरला आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून त्याने रौद्ररुप धारण केलं आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाले आहेत. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील २ हजार ७०० किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे.
अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलांमध्ये वर्षातील १२ महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमीनीपर्यंत पोहचत नाहीत. जगभरातील वनस्पतींपासून तयार होणाऱ्या एकूण ऑक्सिनपैकी २० टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून निर्माण होतो. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता या जंगलांच्या अस्तित्वालाच या भीषण वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. जंगलामधील अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याचे अनेक हृदद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जाणून घेऊयात या जंगलामधील वनसंपत्तीबद्दलच्या १२ गोष्टी…
१)
अॅमेझॉनच्या वनांना जगाचं फुफ्फुस या नावाने ओळखलं जातं
२)
जगभरातील एकूण ऑक्सिजनपैकी २० टक्के ऑक्सिजन या वनांच्या माध्यमातून तयार होतो.
३)
सर्वात मोठं पर्जन्यवन असणारे अॅमेझॉनचे जंगलाचे एकूण क्षेत्रफळ ५५ लाख चौरस फूट इतकं आहे.
४)
दक्षिण अमेरिकेतील ९ देशांमध्ये हे वनक्षेत्र पसरलेले आहे.
५)
अॅमेझॉन पर्जन्यवनाचा सर्वाधिक भाग हा ब्राझीलच्या भूप्रदेशावर आहे. त्याचबरोबरच हे अॅमेझॉनचे जंगल कोलंबिया, व्हेनेझुएला, बोलिविया, फ्रेंच गयाना, पेरु, गयाना, सुरीनेम, आणि एक्वॅडोर या देशांमध्येही आहे.
६)
या जंगलांचा आकारामुळे त्यांची एक स्वतंत्र परिसंस्था अस्तित्वात असून पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि इतर महत्वाच्या नैसर्गिक घटकांचा समतोल राखण्यासाठी हे वनक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.
७)
अॅमेझॉन पर्जन्यवनांमध्ये वनस्पतींच्या ४० हजारहून अधिक जाती आहेत. यामागील अनेक वृक्ष ही काही शे वर्ष जुनी आहेत.
८)
या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपत्तीही आहे. पक्षांच्या १ हजार ३०० हून अधिक प्रजाती येथे असून त्यापैकी काही अत्यंत दूर्मिळ आहेत.
९)
अॅमेझॉन नदीच्या आजूबाजूला पसरलेल्या या जंगलांमध्ये चक्क तीन हजारहून अधिक प्रकारचे प्रकारचे मासे आणि चारशेहून अधिक सस्तन प्राणी अढळून येतात.
१०)
अॅमेझॉनचे पर्जन्यवनामध्ये तब्बल २५ लाखांहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या किटकांचे वास्तव्य आहे.
११)
वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रजातीचे विषारी बेडूक, विजेचा झटका देणारे इलेक्ट्रिक इल्स, भयंकर असे फ्लेश इटिंग पिरान्हा मासे, मांसाहार करणारे जॅग्वार असे अनेक वैविध्यपूर्ण पण हिंस्र प्राणीही या जंगलांमध्ये अढळतात.
१२)
या जगलांमध्ये किटकांबरोबरच हजारो विषारी साप अढळतात. जगातील सर्वात मोठे आणि सर्वात विषारी साप या प्रदेशात आहेत.