पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मॉस्को भेटीवर प्रतिक्रिया दाताना अमेरिकेने युक्रेनमधील रशियाच्या कृतीवर आक्षेप घेणे प्रत्येक जबाबदार देशाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी बुधवारी सांगितले की, युक्रेनमधील परिस्थितीबाबत अमेरिकेने पाकिस्तानला आपली भूमिका कळवली आहे.

“रशियाने युक्रेनवर नव्याने केलेल्या आक्रमणाबाबत आम्ही पाकिस्तानला आमची भूमिका कळवली आहे. आम्ही त्यांना युद्धाबाबत मुत्सद्देगिरीच्या आमच्या प्रयत्नांची माहिती दिली आहे,” असे प्राइस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. युक्रेनसोबतची भागीदारी अमेरिकेच्या हितासाठी महत्त्वाची मानते, असेही प्राइस म्हणाले.

US to impose new sanctions against Iran
इस्रायलवर केलेला हल्ला इराणला भोवणार, अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
israel hamas war united nations security council passes resolution calling ceasefire in gaza
अग्रलेख : पांगुळगाडा पुरे!
America on arvind kejriwal arrest
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईची जर्मनीनंतर अमेरिकेकडूनही दखल

रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर भारतावर काय परिणाम होतील?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस पुढे म्हणाले की, अमेरिका युक्रेनसोबतची भागीदारी अमेरिकन हितसंबंधांसाठी महत्त्वाची मानते. रशियाच्या या कारवाईविरोधात कोणत्याही जबाबदार देशाने आवाज उठवला पाहिजे.

पाकिस्तानचे पंतप्रधान बुधवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी आणि आर्थिक सहकार्यासह मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मॉस्कोला रवाना झाले. पूर्व युक्रेनच्या काही भागांमध्ये लष्करी तैनातीसाठी अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. याशिवाय, अजेंड्यात दोन्ही देश आणि तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानमधील त्यांच्या परस्पर चिंता आणि क्षेत्रीय सुरक्षा सहकार्याचा समावेश असेल. इम्रान खान यांच्या या भेटीमुळे पाकिस्तानला ऊर्जा क्षेत्रात आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये रशियासोबत पुढे जाण्याची संधी मिळू शकते.

रशिया-युक्रेन संघर्षातील जर्मन दुवा – काय आहे नॉर्ड स्ट्रीम-२ पाइपलाइन?

विश्लेषण : रशियाने हल्ल्या केल्यानंतर युक्रेनने लागू केलेला मार्शल लॉ काय आहे? जाणून घ्या….

रशिया आणि पश्चिम यांच्यातील वाढत्या संकटादरम्यान रशियन सैन्याने पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशात प्रवेश केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटणारे इम्रान खान हे पहिले परदेशी नेते आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही मॉस्कोला पोहोचले आहे. १९९९ नंतर जवळपास २३ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. यापूर्वी मार्च १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ रशियाच्या दौऱ्यावर गेले होते.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव रशियाची नॉर्ड स्ट्रीम २ गॅस पाइपलाइन बांधण्याच्या प्रभारी कंपनीवर निर्बंध लादले आहेत. बायडेन म्हणाले की, युक्रेनमधील रशियाच्या कृतींना प्रतिसाद म्हणून ही पावले आमच्या निर्बंधांच्या सुरुवातीच्या टप्प्याचा आणखी एक भाग आहेत. मी स्पष्ट केल्याप्रमाणे, रशियाने पुढे जाणे सुरू ठेवल्यास आम्ही पुढील पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.