केरळमधील कोल्लम येथील बीचवर फिरायला आलेल्या एका अमेरिकन तरुणीबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. बीचवरून दोन तरुणांनी पीडित तरुणीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. दारू प्यायल्यानंतर पीडित तरुणीची शुद्ध हरपली, यानंतर आरोपींनी पीडितेला एका निर्जनस्थळी घेऊन जात अत्याचार केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

जयन (वय-३९) आणि निखिल (वय-२७) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित अमेरिकन तरुणी मंगळवारी सायंकाळी कोल्लम येथील बीचवर फिरायला आली होती. यावेळी आरोपी जयन आणि निखिलने पीडितेशी मैत्री करत तिला दारू पाजली.

हेही वाचा- १० वर्षात ५१ जणांनी ९२ वेळा केला बलात्कार; पीडितेचा पतीच निघाला ‘मास्टरमाइंड’, VIDEO पाहून महिलेला बसला धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी दारुच्या नशेत असणाऱ्या अमेरिकन तरुणीला आपल्या दुचाकीवर बसवून एका निर्जनस्थळी असलेल्या घरात नेलं. याठिकाणी आरोपींनी बेधुंद अवस्थेत असणाऱ्या पीडित तरुणीवर लैगिंक अत्याचार केला. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत घटनेच्या दिवशीच आरोपींना अटक केली. पीडित अमेरिकन महिलेनं नुकतंच एका आश्रमाला भेट दिली होती. ती केरळातील करुणागप्पल्लीजवळ येथे वास्तव्याला होती.