Amit Shah Action Against delhi blast culprits will send a message to world : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी दिल्लीतील कार स्फोटासाठी जबाबदार असणार्यांना कठोरता कठोर शिक्षा दिली जाईल असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा निकाल ‘जगाला एक संदेश देईल’, जेणेकरून यापुढे कोणीही भारतात असा हल्ला करण्याचे धाडस करू नये, असा त्यांचा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
गुजरातमधील मोतीभाई चौधरी सागर सैनिक शाळेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केल्यानंतर संबोधित करताना, शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या स्फोटात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबांप्रति संवेदना देखील व्यक्त केल्या.
“दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांना दिलेली शिक्षा जगाला एक संदेश देईल की, कोणाही आपल्या देशात असा हल्ला करण्याचा विचार करण्याचेही धाडस करू नये,” असे शाह म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दहशतवादी कृत्यासाठी जबाबदार असणार्यांना कठोर शिक्षा देणाचा निर्धार नक्कीच पूर्ण केला जाईल,” असेही शाह म्हणाले.
पंतप्रधान मोदी भूतानमधून परतल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकी पार पडली. या बैठकीत या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या याच ठरावानंतर दुसर्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० नोव्हेंबर रोजी झालेला दिल्लीतील स्फोटाचे वर्णन एक दहशतवादी घटना असे केले आहे. तसेच यावेळी तपास यंत्रणांना हे प्रकरण तत्परतेने आणि व्यावसायिकपणे हाताळण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मुख्य संशयीत डॉ. उमर नबी याची लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार फरीदाबादच्या खांडवली गावातून जप्त केली आहे. तपासकर्त्यांनी सांगितले की, स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटकांनी भरलेली ह्युंदाई i20 कार वापरण्यात आली होती आणि ही फोर्ड इकोस्पोर्ट कार स्फोटामागील संशयितांच्या साथीदारांनी वापरली असावी असा त्यांचा अंदाज आहे.
प्राथमिक तपासात दहशतवादी कट असल्याचे उघड झाल्यानंत, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) औपचारिकपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे आणि त्यासाठी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.
