सत्ता आल्यास घुसखोरीची समस्या सोडवू -शहा

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सोडवू शकले नाहीत

बांगलादेशासमवेत कोणताही करार करण्यात आलेला नसल्याने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सोडवू शकले नाहीत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.
त्या वेळी बांगलादेशासमवेत भूभाग सीमा करार करण्यात आला नव्हता, त्यामुळे सीमेच्या कुंपणाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही, आता आम्ही करार केला आहे, असे शहा यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि आसाममध्ये प्रफुल्लकुमार महंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते तरीही या दोघांनी सीमाप्रश्न का सोडविला नाही, असा प्रश्न शहा यांना विचारण्यात आला होता.
घुसखोरीचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आवश्यक आहे, केवळ आसाम सरकार हा प्रश्न सोडवू शकत नाही, असे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amit shah bjp atal bihari vajpayee

ताज्या बातम्या