लॉस एंजलिस आणि कॅलिफोर्निया या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी ‘जय हो’ नावाच्या एका चॅरिटी म्युझिक शोमध्ये सहभाग नोंदवला होता. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी या शोचं आयोजन केलं होतं. हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रूग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. आपल्याला या शोमध्ये सहभागी होऊन खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर लिहिली आहे. तसेच या कार्यक्रमातले फोटोही पोस्ट केले आहेत.

मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीस या अशा प्रकारच्या अनेक चॅरिटी शोजमध्ये सहभाग घेत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी जय हो या चॅरिटी शोमध्येही सहभाग नोंदवला आणि तिथे त्यांनी गाणंही म्हटलं. तसंच त्या कार्यक्रमाचे काही फोटोही त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस या अमेरिकेतच आहेत. ६ जून रोजी टेक्सासमध्येही जय हो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथेही त्यांनी गाणे म्हटले.

अमृता फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी या कार्यक्रमांचे फोटो पोस्ट केले आहे. या फोटोजना चांगले लाईक्स मिळत आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल अमृता फडणवीस यांचे कौतुकही केले आहे.