गडचिरोलीतल्या एटापल्ली येथील गट्टा भागात निवडणूक पथकाच्या मार्गात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे वृत्त आहे. या स्फोटामध्ये एक जवान जखमी झाला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. उद्या (११ एप्रिल) येथे पहिल्या टप्यातील मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडमध्ये मतदानाची तयारी करण्यासाठी निघालेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गावर बुधवारी (दि.१०) संध्याकाळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यावेळी त्यांच्यासोबत सीआरपीएफच्या १९१ बटालिअनच्या जवानांचे पथक होते. दरम्यान, या स्फोटात एक जवान जखमी झाला आहे.

एका सायकलवर आयईडी स्फोटकं लावून नियोजितरित्या हा स्फोट घडवून आला. कालच छत्तीसगडमध्ये भाजपा आमदाराच्या ताफ्याच्या मार्गात नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण भागात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An ied attack by naxals on polling party at gadchiroli one security personnel injured
First published on: 10-04-2019 at 18:48 IST