Another cloudburst in jammu and kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच ढगफुटीची घटना घडली होती, ज्यामध्ये सुमारे ६५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आथा पुन्हा एकदा कठुआ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात शनिवार आणि रविवारच्या रात्री ढगफुटीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

राजबागच्या जोड घाटी गावात ढगफुटीची घटना घडली. यामुळे गावाचा संपर्क तुटला असून काही मलमत्ता आणि जमिनीचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलले.

पोली आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची संयुक्त पथके घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिकांच्या मदतीने रविवारी सकाळी बचावकार्य सुरू होते.

आत्तापर्यंत चार नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर सहा जखमी लोकांना बाहेर काढून त्यांना रुग्णलयात दाखल केले जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

जिल्ह्यात झालेली ढगफुटी आणि भुस्खलन यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रशासनाला बचाव आणि मदतकार्य करण्याचे आणि नागरिकांची सुरक्षितता निश्चित करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच त्यांनी पीडित कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कठुआ जिल्ह्यात तसेच जोध खेड आणि जुथना येथे भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल आणि नुकसानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शोकाकुल कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच, बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याबरोबरच, मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला बाधित कुटुंबासाठी तात्काळ मदत, बचाव आणि स्थलांतरण उपाय राबवण्याचे आणि त्यांना सुरक्षितता आणि पाठिंबा देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जमू काश्मीरच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कठुआ येथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपण कठुआचे एसएसपी शोभित सक्सेना यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला.

त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, जंगलोट परिसरात ढगफुटीची माहिती मिळाल्यानंतर कठुआचे एसएसपी शोभित सक्सेना यांच्याशी बोललो. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच रेल्वे ट्रॅक, राष्ट्रीय महामार्ग, कठुआ पोलिस स्टेशनचे नुकसान झाले आहे. नागरी प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दलाने मदतकार्य सुरू केले आङे. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.