जगप्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी शेफ अँथनी बॉर्डेन यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झालं आहे. फ्रान्समध्ये सध्या ते एका शोसाठी चित्रिकरण करत होते. हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी फ्रेंच शेफ इरिक रिपर्ट यांना आढळला. अँथनी यांनी आत्महत्या केल्याचा दाट संशय सीएनएननं व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक फूड शोद्वारे अँथनी यांनी आपली ओळख निर्माण केली. कथाकथनांचं उत्तम कौशल्य त्यांच्याजवळ होतं. प्रत्येक फूड शो होस्ट करताना त्यांच्या या शैलीमुळे ते प्रेक्षकांचे खूप आवडते शेफ बनले होते. जगभरातील अनेक देशांत त्यांनी भ्रमंती केली. ते शेफ, उत्तम खव्वय्ये तर होतेच पण चांगले निवेदकही होते. खाद्यसंस्कृती, भ्रमंती या विषयावरच त्यांनी बरंच लेखनही केलं होतं.

फ्रान्समध्ये ते ‘पार्ट अननोन’ या ट्रव्हल अँड फूड शोसाठी एपिसोड चित्रीत करत होते. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह एका फ्रेंच शेफला आढळला. ‘पार्ट अननोन’ हा त्यांचा ट्रव्हल शो गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या शोनं ५ प्रतिष्ठीत अॅमी अवॉर्डही जिंकले आहेत. जरी त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी त्यांच्या मृत्यूचं खरं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anthony bourdain has died at 61 the cause of death was may be suicide
First published on: 08-06-2018 at 18:24 IST