पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद शहरात चीन आणि पाकिस्तानविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. निलम आणि झेलम नदीवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या धरणांच्या बांधकामाविरोधात हे निदर्शन करण्यात आलं. सोमवारी मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरुन रॅली काढत निलम झेलम आणि कोहला हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बांधकामाचा निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनादरम्यान पाकिस्तान आणी चीनकडून सुरु असलेल्या या बांधकामामुळे निसर्गावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्यात आलं. जागतिक पातळीवर हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी ट्विटरवर #SaveRiversSaveAJK हे कॅम्पेनही ट्रेंड करण्यात आलं. कोणत्या कायद्याखाली पाकिस्तान आणि चीनकडून या वादग्रस्त जमिनीवर बांधकाम केलं जात आहे अशी विचारणा आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

पाकिस्तान आणि चीनकडून या नदींचा ताबा घेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप आहे. चिनी कंपनी आणि पाकिस्तान आणि चीनच्या सरकारदरम्यान कोहला येथे ११२५ मेगावॅट हायड्रो पावर प्रोजेक्ट उभारण्यासाठी करार झाला आहे. यासाठी २.४ बिलियन डॉलर इतका खर्च येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti china protests held in pok against illegal construction of dams sgy
First published on: 07-07-2020 at 08:43 IST