कनेक्टिकट येथील शाळेत झालेल्या हत्याकांडानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेतील शाळांमध्ये सशस्त्र रक्षक ठेवण्याची सूचना अमेरिकी राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (एनआरए) मांडली आहे. मात्र या सुचनेला न्यूयॉर्कचे महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेत कोणतीही जागा सुरक्षित नसली तरी मात्र अशाप्रकारे सशस्त्र सुरक्षारक्षक नेमणे अतिशय धोकादायक आणि िहसेला आमंत्रण देणारे ठरू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
देशातील बंदूक नियंत्रण कायदा अधिक मजबूत करावा या भूमिकेला पाठिंबा देणारे ब्लूमबर्ग म्हणाले की, देशातील मातब्बर बंदूक निर्मात्यांची लॉबी सध्याच्या हिंसक कृत्यांचा बीमोड करण्यासाठी सशस्त्र सुरक्षारक्षकांचा प्रस्ताव मांडत असली तरी तो धोकादायक असून, प्रत्येकाच्या हातात शस्त्र आल्यास एकही जागा सुरक्षित राहणार नाही आणि हे पाऊल अधिक धोकादायक तसेच िहसक ठरू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आठवडय़ाभरापूर्वीच कनेक्टिकट येथील एका शाळेत माथेफिरू युवकाने केलेल्या गोळीबारात २० लहान मुलांसह २६ जण मारले गेले होते. या घटनेने अमेरिकेसह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आणि बंदूक कायद्यात सुधारणा करण्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र या हत्याकांडामागे िहसक व्हिडीओ गेम्स, प्रसारमाध्यमे आणि कायद्याची कमकुवत अंमलबजावणी यामुळेच अशाप्रकारचे रक्तरंजित हत्याकांड घडत असल्याचा आरोप राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (एनआरए) शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
माथेफिरू बंदूकधाऱ्यांना रोखण्यासाठी चांगल्या माणसांच्या हाती बंदूक देणे आवश्यक झाले असून, त्यामुळेच आता शाळांमध्ये सशस्त्र रक्षक नेमण्याची गरज असल्याचे मत एनआरएचे उपाध्यक्ष वेन लापेरी यांनी व्यक्त केले. त्यावर ब्लूमबर्ग यांनी नाराजी व्यक्त करून, सशस्त्र रक्षकाची कल्पना फेटाळून लावली. तसेच अध्यक्ष बराक ओबामा यांनी देशातील बंदूक परवाना कायद्यात नव्याने सुधारणा करण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, असे आवाहनही ब्लूमबर्ग यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2012 रोजी प्रकाशित
शाळांमध्ये सशस्त्र रक्षकांची नियुक्ती अधिक धोकादायक
कनेक्टिकट येथील शाळेत झालेल्या हत्याकांडानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेतील शाळांमध्ये सशस्त्र रक्षक ठेवण्याची सूचना अमेरिकी राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (एनआरए) मांडली आहे. मात्र या सुचनेला न्यूयॉर्कचे महापौर मायकेल ब्लूमबर्ग यांनी तीव्र विरोध केला आहे.

First published on: 23-12-2012 at 01:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armed guards at school will create more violent america mayor