पीटीआय, सोनिपत

अशोक विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अली खान महमुदाबाद यांना रविवारी दिल्लीत अटक करण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’वर सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्टच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. देशाचे सार्वभौमत्व आणि एकता धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.

दुसरीकडे, हरियाणाच्या नूह जिल्ह्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी २६ वर्षांच्या अरमानला या तरुणाला अटक केली. भारतीय लष्कराच्या हालचालींबाबत तो पाकिस्तानला माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तो या कारवाया करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हॉट्सअॅप आणि इतर सामाजिक माध्यमांतून तो पाकिस्तानला माहिती पुरवीत होता. त्याच्या मोबाइल फोनवर पाकिस्तानी क्रमांकावर फोटो, व्हिडिओ सामायिक केल्याचे आढळले. स्थानिक न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राचा पुरीमधील यूट्यूबरशी असलेल्या संबंधांचा ओडिशा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही यूट्यूबर कर्तारपूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन आली होती.