दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सुयोग्य निवासस्थानाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नगरविकास मंत्रालयाने केजरीवाल यांच्यासाठी टिळक मार्गावरील तीन बेडरूमचे निवासस्थान निश्चित केले आहे.
मालमत्ता संचालनालयाने केजरीवाल यांना सी-२/२३, टिळक मार्ग, टाइप-६ पद्धतीचे निवासस्थान मंजूर केले आहे. पतियाळा हाऊस न्यायालयाजवळ हे निवासस्थान असून ते १६०० चौ. फूट परिसरावर, हिरवळीवर पसरलेले आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात योग्य निवासस्थान उपलब्ध करून देण्याची विनंती दिल्ली सरकारने केली होती. दिल्ली सरकारच्या ताब्यात अनेक बंगले असले तरी केजरीवाल यांनी दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील निवासस्थानाला पसंती दर्शविली आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना ३, मोतीलाल नेहरू प्लेस हा बंगला सोडण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याबाबत त्यांना पत्रही पाठविण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्री केजरीवाल यांना नवी सदनिका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सुयोग्य निवासस्थानाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. नगरविकास मंत्रालयाने
First published on: 19-01-2014 at 04:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwals hunt for a house comes to an end