राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने माइक भिरकावला. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ शुक्रवारचा आहे. गेहलोत यांचा हा व्हिडीओ एका कार्यक्रमातला आहे. ते महिलांना सरकारी योजनांची माहिती देत होते. तेवढ्यात त्यांचा माईक बंद पडला. ज्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने माईक भिरकावला.

नेमकं काय घडलं?

ही घटना शु्क्रवारी रात्रीची आहे. सर्किट हाऊस या ठिकाणी महिलांसाठी ज्या सरकारी योजना चालवल्या जातात त्याचा फिडबॅक घेण्याच्या दृष्टीने ते महिलांच्या एका समूहाशी संवाद साधत होते आणि माईकवरुन त्यांच्याशी बोलत होते. बोलता बोलता अशोक गेहलोत यांचा माईक बंद झाला. यानंतर अशोक गेहलोत चांगलेच चिडले त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने माईक भिरकावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या या कृतीमुळे महिलांच्या मागे काही लोक उभे होते त्यांनी चांगलीच नाराजी दर्शवली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांना तिथे बोलवण्यात आलं. गेहलोत विचारु लागले की एसपी कुठे आहेत? पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी दोघेही मला एकसारखेच वाटत आहेत असं म्हणत त्यांनी पोलीस अधीक्षकांवर ते चिडले होते. बाडमेरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ही घटना घडली आहे. त्यांनी फेकलेला माईक जिल्हाधिकाऱ्यांनी उचलला. त्यानंतर दुसरा माईक घेऊन त्यांनी महिलांशी संवाद साधला.