माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं राजकारणाबरोबरच कविता, चित्रपट चित्रपट क्षेत्राशी विशेष असं नातं होतं. वाजपेयी हे बॉलिवूडची ड्रीमगर्ल अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनींचे खूप मोठे चाहते होते. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला हेमा मालिनी यांचा ‘सीता और गीता’ इतका आवडला होता की, त्यांनी तो चित्रपट तब्बल २५ वेळा पाहिला होता.

अभिनयासोबतच राजकारणामध्येही सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एका कार्यक्रमामध्ये हा किस्सा सांगितला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हेमामालिनी यांचा ‘सीता और गीता’ हा चित्रपट २५ वेळा पाहिल्याचे सांगितले. भाजपच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हेमा मालिनी यांनी विनोद खन्ना यांच्याविषयीचीसुद्धा एक आठवण सांगितली. ‘मला राजकारणामध्ये आणण्याचे श्रेय विनोद खन्ना यांना जाते’, असे हेमा मालिनी म्हणाल्या.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

यावेळी आपल्या राजकीय कारकिर्दीतील बऱ्याच आठवणी जाग्या करत हेमा मालिनी यांनी काही किस्से उपस्थितांना सांगितले. त्या म्हणाल्या, ‘भाषणामध्ये मी नेहमीच अटलजींचा उल्लेख करते. पण, मी त्यांना कधी भेटले नव्हते. एकदा लालकृष्ण अडवाणी मला अटलजींना भेटायला घेऊन गेले. मी ज्यावेळी अटलजींना पहिल्यांदा भेटले तेव्हा ते फारसे खुलून बोलत नव्हते. त्यावेळी तिथे असलेल्या एका महिलेला मी सर्व ठिक आहे ना..? असा प्रश्न केला. तेव्हा ती महिला म्हणाली, अटलजी तुमचे फार मोठे चाहते आहेत. त्यांनी १९७२ मध्ये आलेला ‘सीता और गीता’ हा चित्रपट २५ वेळा पाहिला आहे. त्यामुळे अचानक तुम्ही समोर आल्यामुळेच ते थोडे संकोचले असावेत.’

हेमा मालिनी यांचा हा किस्सा अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला. राजकीय वर्तुळामध्ये मानाचं स्थान असणारी इतकी मोठी व्यक्ती आपल्या चाहत्यांपैकी एक आहे, हे जेव्हा हेमामालिनी यांना कळलं तेव्हा त्यासुद्धा भारावून गेल्या होत्या.