एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) अर्थात विमानांना उड्डाण करण्यास मदत करणारे इंधनाची किंमत राष्ट्रीय राजधानीत ५ टक्क्यांनी वाढवून ₹१२३,०३९.७१ प्रति किलो (₹१२३.०३ प्रति लीटर) झाली आहे. जेट इंधन, जे विमान कंपनीच्या चालू खर्चाच्या जवळपास ४०% भाग घेते, त्यांने या वर्षी नवीन उच्चांक गाठले आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून दर पंधरवड्याला जेट इंधनाच्या किमती वाढत आहेत.

सर्वात मोठी वाढ

१६ मार्च रोजी १८.३ टक्के (रु. १७,१३५.६३ प्रति किलो) आणि १ एप्रिल रोजी २ टक्के (रु. २,२५८.५४ प्रति किलो) वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर जेट इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. स्थानिक कर आकारणीनुसार हे दर राज्यानुसार वेगळे असतील.

(हे ही वाचा: Petrol Diesel Price Today: राज्यामध्ये आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग ४० व्या दिवशीही कायम आहेत. इंधनाच्या दरात शेवटची वाढ ६ एप्रिल रोजी प्रति लिटर ८० पैशांनी झाली होती.