हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे आमदार शब्बीर अली यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ओवेसी आणि अन्य काही जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. येथील मीर चौक परिसरात आपल्यावर हल्ला करण्यात आल्याची तक्रार तेलंगण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते शब्बीर अली यांनी मंगळवारी ओवेसी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध नोंदविली. ओवेसी आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप तेलंगण प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख उत्तमकुमार रेड्डी आणि अली यांनी केला. या वेळी काही समाजकंटकांनी रेड्डी यांच्या गाडीचीही मोडतोड केली. ओवेसी आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची तक्रार एका ऊर्दू दैनिकाच्या प्रतिनिधीनेही केल्याचे पोलिसांनी सांगितले.