सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर कोणी हल्ला केला हे मला माहिती नाही. पण जे घडले ते देशासाठी चिंताजनक असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी व्यक्त केले.
‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी सकाळी शाई फेकली. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ‘ओआरएफ’कडून मुंबईमध्ये ठेवण्यात आला आहे. त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तींनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली.
यावर प्रतिक्रिया देताना अडवाणी म्हणाले, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. हा हल्ला कोणी केला ते मला माहिती नाही. पण हे कृत्य देशासाठी चिंताजनक आहे. माझे अजून सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी बोलणे झालेले नाही. शाई फेकण्याची कृती अत्यंत चुकीची आहे. यातून वाढती असहिष्णूता दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on kulkarni shows growing intolerance condemn it advani
First published on: 12-10-2015 at 13:57 IST