अ‍ॅपल फोन आणि ऑयपॅडच्या नव्या आवृत्तीत संवर्धित वास्तविकतेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅलिफोर्निया येथे नुकत्याच झालेल्या अ‍ॅपलच्या वार्षिक बैठकीत या नव्या तंत्रज्ञानाबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली.

या तंत्रज्ञानात संवर्धित वास्तक आणि भौतिक जगाचा मेळ घातलेला असेल. यावेळी अ‍ॅपलचे कार्यकारी प्रमुख क्रेग फेडेरिघी यांनी प्रात्यक्षिक सादर केले. त्यात त्यांनी कॉफीचा कप आणि टेबलावरील दिवा यांचे संवर्धिक (आभासी) वास्तव या तंत्रज्ञानाद्वारे दाखवून दिले. इतर अ‍ॅपचाही या तंत्रज्ञानाद्वारे विकास करण्याचा अ‍ॅपलचा प्रयत्न आहे. त्याचा वापर हजारो ऑयफोन आणि आयपॅडमध्ये करण्यात येणार आहे, असे फेडेरिघी म्हणाले. मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि गुगल यांचाही हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांचे याबाबतचे सुरू असलेले संशोधन प्राथमिक पातळीवर आहे. अ‍ॅप निर्मिती करणाऱ्यांनाही अ‍ॅपलकडून यापैकी काही तंत्रज्ञान देण्याचा विचार आहे. हे तंत्रज्ञान आयओएस ११ या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असून ते सप्टेंबपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी २०११मध्ये हे पद स्वीकारल्यापासून तंत्रज्ञान विकासावर अधिक भर दिला आहे. चालकरहित कार, कृत्रिम गुप्तहेर, सुरू असलेला टि.व्ही असे तंत्रज्ञान त्यांनी अ‍ॅपलला उपबल्ध करून दिले. मात्र, संवर्धित वास्तविकता हा त्यापुढील टप्पा असून वास्तविक जग, व्हिडिओ गेम आणि व्हिडिओ यापुढील हे तंत्रज्ञान आहे.