श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील एका गावात शनिवारी हिमस्खलन झाले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एक दिवसापूर्वी मध्यम ते मोठी हिमवृष्टी झाल्यानंतर बांदीपोरासह १२ जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी दुपारी गुरेझच्या जुन्नियल गावाला हिमस्खलनाचा फटका बसला. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) शनिवारी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यासाठी हिमस्खलनाचा अधिक धोका व बांदीपोरा, बारामुल्ला, डोडा, गांदरबल, किश्तवाड, पूंछ, रामबन आणि रियासी जिल्ह्यांसाठी मध्यम धोक्याचा इशारा जारी केला. येत्या २४ तासांत कुपवाडा जिल्ह्यात दोन हजार मीटर उंचीवरील भागात हिमस्खलन होण्याची शक्यता आहे. बांदीपोरा, बारामुल्ला, डोडा, गांदरबल, किश्तवाड, पूंछ, रामबन आणि रियासी येथेही दोन हजार मीटरवर हिमस्खलनाचा धोका आहे. आगामी २४ तासांत अनंतनाग, कुलगाम आणि राजौरी जिल्ह्यांते २,००० मीटरपेक्षा उंच भागात कमी धोक्याचे हिमस्खलन होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avalanche warnings in 12 districts of jammu and kashmir zws
First published on: 15-01-2023 at 04:19 IST